NAVI MUMBAI URAN CBD BELAPUR NEW LOCALS GOING TO START WITHIN 10 MIN. INTERVAL

 NAVI MUMBAI URAN CBD BELAPUR NEW LOCALS GOING TO START WITHIN 10 MIN. INTERVAL

नवी मुंबईतील नागरिकांसाठी चांगली बातमी, दर १० मिनिटांनी उरण लोकल!

नवी मुंबईतील उरण-बेलापूरच्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. मध्य रेल्वेने बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावर १० मिनिटांनी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे.

मुंबई : उरण ते बेलापूर दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना लवकरच जलद आणि स्वस्त प्रवासाचे माध्यम असलेली लोकलसेवा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेचा चौथा उपनगरीय मार्ग अर्थात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावर दर दहा मिनिटांच्या वारंवारतेने लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. यासाठी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तीन नवीन रेल्वेगाड्या महामुंबईत दाखल होणार आहेत.


belapur uran railway line latest news
नवी मुंबईतील नागरिकांसाठी चांगली बातमी, दर १० मिनिटांनी उरण लोकल!
मुंबई, ठाणे, बदलापूर, टिटवाळा, पालघर, डहाणू या ठिकाणी शहरीकरण झपाट्याने झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट येथून या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपनगरीय रेल्वेची जोडणी आहे. पनवेल, बेलापूर, उरण यांचा समावेश महामुंबईत झाल्याने ही शहरे लोकलने जोडण्यासाठी मध्य रेल्वेने प्राधान्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

खारकोपर ते बेलापूर आणि बेलापूर ते नेरुळ अशा एकूण ४० लोकल फेऱ्या धावतात. सध्या हा पहिला टप्पा आहे. उरणपर्यंत मार्ग तयार झाल्यावर आणि या ठिकाणी लोकल धावू लागल्यानंतर दर दहा मिनिटांनी लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. यासाठी सध्या धावत असलेल्या लोकल फेऱ्यांचा विस्तार करणे, नवीन लोकल फेऱ्या सुरू करणे आणि अन्य कोणत्या स्थानकावरून लोकल सुरू करता येईल का, या सर्व पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे. प्रवासी प्रतिसाद वाढल्यानंतर वारंवारतेत बदल करण्यात येईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महामुंबईतील प्रवाशांसाठी ४०० किमीपर्यंत लोकल विस्तार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. हा विस्तार पूर्ण करण्यासाठी बेलापूर-उरण मार्ग, कर्जत-पनवेल नवीन रेल्वेमार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण या प्रकल्पांची पूर्ती होणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेच्या प्रतिष्ठित प्रकल्पात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गाचा समावेश होतो. या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत.
बेलापूर-खारकोपर-उरण मार्गासाठी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीमधून तीन लोकल मागवण्यात आल्या आहेत. तसे पत्र मध्य रेल्वेने नुकतेच पाठवले आहे. लवकरात लवकर या गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

Clinic hospitals names advise

Coaching Classes