NAVI MUMBAI URAN CBD BELAPUR NEW LOCALS GOING TO START WITHIN 10 MIN. INTERVAL
NAVI MUMBAI URAN CBD BELAPUR NEW LOCALS GOING TO START WITHIN 10 MIN. INTERVAL नवी मुंबईतील नागरिकांसाठी चांगली बातमी, दर १० मिनिटांनी उरण लोकल! नवी मुंबईतील उरण-बेलापूरच्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. मध्य रेल्वेने बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावर १० मिनिटांनी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे. मुंबई : उरण ते बेलापूर दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना लवकरच जलद आणि स्वस्त प्रवासाचे माध्यम असलेली लोकलसेवा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेचा चौथा उपनगरीय मार्ग अर्थात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावर दर दहा मिनिटांच्या वारंवारतेने लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. यासाठी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तीन नवीन रेल्वेगाड्या महामुंबईत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतील नागरिकांसाठी चांगली बातमी, दर १० मिनिटांनी उरण लोकल! मुंबई, ठाणे, बदलापूर, टिटवाळा, पालघर, डहाणू या ठिकाणी शहरीकरण झपाट्याने झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट येथून या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपनगरीय रेल्वेची जोडणी आहे. पनवेल, बेलापूर, उरण यांचा स...